अकोला (प्रतिनिधी) : यागराज त्रिवेणी संगमात कुंभ मेळाव्याच्या पर्वावर स्नानासाठी रेल्वेने जात असलेल्या अकोल्यातील भाविकांना लुटल्याची घटना मध्यप्रदेशात गुरुवारी मध्यरात्री नंतर घडली. लुटारूंनी बंदुकीच्या धाकावर ७ ते ८ लाखाचा ऐवज लंपास केला. दरम्यान, खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी रेल्वे मंत्र्यांशी भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला.
अकोल्यावरून नगर संघचालक गोपाल खंडेलवाल, रेखा खंडेलवाल यांचे समवेत जुगलकिशोर खंडेलवाल, शामली खंडेलवाल, रश्मी खंडेलवाल, दिनेश खंडेलवाल, पुष्पा खंडेलवाल सह १५ भाविक सिकंदराबाद दानापूर रेल्वेने प्रयागराजकडे निघाले हाेते. रेल्वे इटारसी ते पिपरिया रेल्वे स्थानकाच्या दरम्यान जनरल बोगीतून साखळी ओढून १० दरोडेखोरांनी वातानुकूलित बोगीमध्ये प्रवेश केला. त्यांनी बंदूक व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून जवळपास ७ ते ८ लाख रुपयाचा ऐवज लुटला.
लुटमार सुरु असल्याचे नगर संघचालक गोपाल खंडेलवाल यांचे डब्यातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने ते सावध झाले. त्यामुळे बोगीमधील गोपाल खंडेलवाल व इतर नागरिक बचावले. मात्र खंडेलवाल कुटुंबातील इतरांना लुटमारी सहन करावी लागली.
अधिक वाचा : दारू अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola