अकोला (प्रतिनिधी) – महापालिकेचा बेताल कारभार सुधारण्यासाठी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले असून, सोमवार आयुक्तांनी थेट विविध विभागामध्ये सकाळी धाव घेत झाडाझडती घेतली. या वेळी गैरहजर आढळलेल्या ५१ कर्मचाऱ्यांची एका दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. एकाच दिवशी झालेल्या या कारवाईमुळे हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना सर्व अधिकारी-कर्मचारी वेळेवर कार्यालयात भेटतातच असे नाही. खूप वेळ प्रतीक्षा केल्यानंतर आलेले काही अधिकारी-कर्मचारी संबंधित नागरिकांस साैजन्याची वागणूक देतीलच, याची शाश्वती नसते. नियमांनुसारही होणाऱ्या कामासाठी एक तर कोणाची तरी शिफारस लागते किंवा संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याचे खिसे तरी गरम करावे लागतात. मिळेल तेथे वरिष्ठ अधिकारी पैसे खाण्यात गुंग असल्याचे यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्याच्या निमित्ताने शिक्कामोर्तबही झाले होते. या सर्व प्रकारांमुळे महापालिका प्रशासनाची प्रतिमा डागाळल्या गेली असून, प्रशासनाला शिस्त लागावी, यासाठी आता काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले आयुक्त संजय कापडणीस यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी २८ जानेवारीला सकाळी विविध विभागांमध्ये धाव घेत पाहणी केली. या वेळी गैरहजर आढळलेल्या अभियंता, आरोग्य निरीक्षक, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
दोन अभियंत्यांची सेवा समाप्त आरोग्य निरीक्षक बडतर्फ
सध्या महापालिकेत विना कामाचे असलेल्या, कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येत आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून नगररचना विभागातील दोन कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यांनी सेवा समाप्त करण्यात आाली आहे. या दोन्ही अभियंत्यांना एका कंपनीकडून नियुक्त करण्यात आले होते. तसेच एका आरोग्य निरीक्षकावर बडतर्फीचीही कारवाई करण्यात आली. हा आरोग्य निरीक्षक महापालिकेत कंत्राटी तत्वावर कार्यरत होता. कारवाईचा धडका येथेच थांबला असून, याव्यतिरिक्त एका प्रभारी आरोग्य निरीक्षकाला त्याच्या मूळ पदावर पाठवण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.
जलप्रदाय विभागात घेतली धाव
मनपाचा जलप्रदाय विभाग कारभारामुळे नेहमीच चर्चेत असतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुक्तांसह काही अधिकाऱ्यांनी जलप्रदाय विभागात धाव घेत प्रश्नांची सरबत्तीच केली. गत पाच वर्षाच्या कामाकाजा आढावा घेण्यासाठी आवश्यक त्या फाइल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते.
काहींनी अशीही लढवली शक्कल
आयुक्त झाडाझडती घेत असल्याची माहिती काही लेटलतिफ कर्मचाऱ्यांना मिळाली. आयुक्त मुख्यद्वाराजवळच उभे असल्याचेही या कर्मचाऱ्यांना कोणी तरी सांगितल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेत न पाहोचलेल्या या कर्मचाऱ्यांनी मुख्य द्वाराऐवजी मागील दाराने आतमध्ये प्रवेश केल्याचे समजते.
अन उशिरा आले अन वेतन कटले
१ आयुक्तांनी २८ जानेवारीला सकाळी १०.३०नंतर लगेच विविध विभागांत धडक देत झाडाझडती सुरु केली. नोंदी तपासल्या. जवळपास ५१ कर्मचारी गैर हजर असल्याचे पुढे आले. त्यामुळे त्यांचे एका दिवसाचे वेतन कपातीचा आदेश आदेश आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला दिला.
२ २६ व २७ जानेवारी असे दोन दिवस शासकीय सुटी होती. त्यामुळे उशिरा येण्याची सवय लागलेले कर्मचारी १०.३० नंतर मनपात पोहोचले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी उशिरा पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.येथून पुढे तरी हे कर्मचारी वेळेवर हजर राहतील, अशी अपेक्षा आहे.
अधिक वाचा : कर वसुली करा नाहीतर कारवाईला सामोरे जा,महापालिका आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना दम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola