अकोला (प्रतिनिधी) : महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असणाºया मालमत्ता कराच्या वसुलीला शहरातील उच्चभ्रू नागरिक, डॉक्टर, विधिज्ञ, उद्योजकांसह बड्या व्यावसायिकांनी खोडा घातला असून, संबंधित मालमत्ताधारकांच्या आडमुठ्या धोरणामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटीत होण्याच्या मार्गावर आहे. परिस्थिती लक्षात घेता मनपाच्या टॅक्स विभागाने कर बुडव्या मालमत्ताधारकांवर कारवाई करून टॅक्स वसुली न केल्यास कामचुकार वसुली निरीक्षकांवर कारवाई अटळ असल्याचा इशारा महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी दिला आहे.
महापालिका प्रशासनाने उत्पन्नात वाढ केल्याशिवाय विकास कामांसाठी निधी देणार नसल्याची भूमिका राज्य शासनाने घेतली होती. शासनाक डून प्राप्त निधीमध्ये मनपाचा आर्थिक हिस्सा जमा करण्याची अट बंधनकारक केल्यामुळे मनपाने उत्पन्न वाढीचा निर्णय घेत ‘जीआयएस’प्रणालीद्वारे मालमत्तांचे मूल्यांकन केले. २०१६ पूर्वी मनपाच्या दप्तरी ७१ हजार मालमत्ता होत्या. मूल्यांकनानंतर त्यामध्ये वाढ होऊन १ लाख ४ हजार व हद्दवाढ झालेल्या क्षेत्रात ५० हजार अशा एकूण १ लाख ५४ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली.
यापासून मनपाला दरवर्षी ७० कोटींचे उत्पन्न प्राप्त होईल. प्रशासनाने सत्ताधारी भाजपच्या संमतीने सुधारित क रवाढ केली. चालू आर्थिक वर्षातील कर व मागील थकीत रकमेचा आकडा १०० कोटींच्या घरात होता. आजवर प्रशासनाने सुमारे ३० कोटी रुपये वसूल केले. उर्वरित रक्कम वसूल न केल्यास महापालिकेतील सफाई कर्मचाºयांसह इतर कर्मचारी, शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाºयांचे वेतन थकीत राहणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
अधिक वाचा : अकोल्यातील शाळा महाविद्यालय परिसरात चिडीमारांचा बोलबाला, विद्यार्थीनी मध्ये भीतीचे वातावरण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola