पातुर (निलेश किरतकर): हिवाळा जवळपास संपत आलेला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. जसजसा उन्हाळा जवळ येईल तसतसे नदी नाले आटून कोरडे होताना दिसतायत. असच काहीसं चित्र आहे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा या गावच. गावच्या लगतच निर्गुणा नदीचे भले मोठे पात्र आहे. परंतु नदी काठी असलेल्या शेतकऱ्यांनी नदीत मोटारी टाकून उपसा सिंचनाने नदी कोरडी करून टाकलीय. याचा परिणाम गावातील विहिरींवर आणि हातपंपावर झालाय. गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेलीये. परिणामी पाण्याअभावी गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.
गावातील पाणी समस्यांवर ठळक आणि प्रभावी उपाययोजना कराव्या, नदीवर असलेला कोल्हापुरी बंधारा अडवून पाणी साठवावे, या मागणीसाठी गावातील बचत गटाच्या महिला ग्राम पंचायत कार्यालयावर धडकल्या. यावेळी महिलांनी गावच्या सरपंच सौ. वर्षा खरात, उपसरपंच दिलीप कुरई, ग्रा.पं. सदस्य प्रकाश धोत्रे, विलास सिरसाट, यांनी महिलांनी पाणी समस्या मिटविण्याबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनावर वंदना किरतकार, सिंधुबाई सिरसाट, इत्यादी महिलांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
अधिक वाचा : शिक्षकांच्या प्रलंबीत समस्या पंधरा दिवसात निकाली काढण्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे निर्देश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola