अकोला (प्रतिनिधी) : अकोला जिल्ह्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या सेवाविषयक प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या समस्या ह्या येत्या पंधरा दिवसात निकाली काढून अनुपालन अहवाल सादर करण्याचे लेखी निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले.
दिनांक १३ जानेवारी २०१९ ला नियोजन भवन अकोला येथे शिक्षण विभागची आढावा सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी तालुकावार आढावा घेऊन प्रलंबित असलेल्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावे काही प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी परंतू शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निश्चित कालमर्यादेत सुटणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी प्राथमिक विभागाच्या पुढील समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी चर्चा झाली.
विषय शिक्षक पदस्थापना त्वरित करणेबाबत, अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन करणे,चटोपाध्याय वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रस्ताव मंजूर करणे,अंशदायी पेंशन योजनेत कपात झालेल्या रकमेच्या स्लिप देणे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापनेबाबत कार्यवाही करणे, वैद्यकीय देयके/भनिनी देयके/रजा वेतन देयके वेळेत निकाली काढणे, तालुकास्तरीय प्रलंबित समस्या तात्काळ सोडवणेबाबत, यासह अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून निकाली काढण्यासाठी कार्यवाही चे निर्देश दिले
माध्यमिक विभाग — अतिरिक्त शिक्षकांना सामाऊन किंवा रूजू करून घेतले नाही अशा शिक्षकांचे वेतन मुळ शाळेतून काढणेबाबत, माध्यमिक शाळांना आर टी ई ची मान्यता त्वरित द्यावी, जि पी एफ परतावे वेळेत देण्यात यावे, सन २००५ पुर्वीच्या शिक्षकांचे भनिनी खाते त्वरीत उघडण्यात यावे, शिक्षकेतर कर्मचारी समायोजन बाबतीत कार्यवाही करावी, वैद्यकीय परिपूर्ती देयके निश्चित कालमर्यादेत अदा करावी, यासह अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून निकाली काढण्यासाठी निर्देशित केले
या सभेला शिक्षणाधिकारी माध्य प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी प्राथ वैशाली ठग उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार सर्व गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधिक्षक, विस्तार अधिकारी शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर यांचेसह शिक्षण विभाचे कर्मचारी व संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : महादेव कोळी जमातीच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार : पालकमंत्री रणजित पाटील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola