अकोला (प्रतिनिधी)- भाजपाने गेल्या निवडणूकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे विश्वासघातकी भाजपा सरकारला धडा शिकविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष डॉ.सुभाषचंद्र कोरपे यांनी केले. महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशाप्रमाणे खेडोपाडी जाऊन घरोघरी जनसंपर्क अभियान राबवितांना गोरेगांव खु. येथील नागरीकांसमोर ते बोलत होते. कोरपे मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल अकोला येथील काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानास सुरुवात झल्यानंतर गोरेगांव खु. येथे डॉ.कोरपे यांच्या समवेत काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते हेमंत देशमुख, रमेशमामा म्हैसने, जयंत इंगोले, गजानन डेहणकर, अजाबराव टाले, गुलाबराव थोरात, बाबुराव इंगळे, प्रफुल्ल गुप्ते, यांनी सक्रिय सहभाग घेतला.
अकोला ते गोरेगांव खु. येथील रोडची दुरावस्था झली, शेतरस्त्यांचा प्रश्न अद्यापही कायम आहे. शेतक-यांच्या प्रश्नावर भारत सरकार उदासीन आहे. अशा प्रतिक्रिया नागरीकांनी दिल्यात. त्यामध्ये प्रामुख्याने महादेवराव डंबाले, शेषराव डंबाले, संतोष डंबाले, अंबरीष डंबाले, चंद्रशेखर डंबाले, संजय कृ.वाकोडे, उमेश मालोकार, अशोकराव भिसे, नाजुकराव डंबाले, प्रकाश वाकोडे, गुलाबराव डंबाले, अशोक डंबाले, ज्ञानदेवराव वाकोडे, सुरेश सोनटक्के, राजकुमार वास्कर, अरुण वाकोडे, ब्रम्हदेव वाकोडे, विनोंद गावंडे, मंसाराम तिखीले, देवेंद्र डंबाले, ऋषीकेश डंबाले,सुरेश गावंडे यांचेसह गावातील बहुसंख्य महिला- पुरुषांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन हेमंत देशमुख तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष जयंत इंगोले यांनी केले.
अधिक वाचा : वेडकाढू भाजप सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी – रमेश म्हेसने
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola