अकोला (प्रतिनिधी ) : शेती व शेतकऱ्यांची जाण नसलेल्या भाजपाने वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारून जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजना फसवी असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश म्हेसने यांनी केली. अकोला तालुका कांग्रेस कमिटीने सुरू केलेल्या जनसंपर्क अभियान प्रसंगी कळंबेश्वर येथील नागरिकांनी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. अल्पभूधारकाशिवाय सर्व शेतकऱ्यांना अनुकूल अशी सुटसुटीत कर्जमाफी योजना भाजप सरकारने राबवणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नसल्याने शेतकर्यांची फसवणूक झाली. त्यामुळे आता मतविभाजन टाळून भाजपा सरकार हद्दपार करण्याची गरज असल्याचे यावेळी नागरिकांनी बोलुन दाखवले. त्यामध्ये प्रामुख्याने डीगंबर गोंडचवर, रमेश गोंडचवर , अजाबराव महल्ले, विश्वास गोंडचवर, सुभाष निकामे, आशिष जवेरी, रामेश्वर गावंडे, केशव महल्ले, विठ्ठल महल्ले, दिनेश गोंडचवर, सुनील निकामे, रामदास निकामे, बाळू खेडकर, ओंकार खिरेकर, सारंगधर शिंदोलकर यांची उपस्थिती होती.
कोरपे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अकोलामधील जनसंपर्क कार्यालयातून सुरू झालेल्या अभियानात अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोशाध्यक्ष डॉक्टर सुभाषचंद्र कोरपे, हेमंत देशमुख, रमेशमामा म्हेसने, जयंतराव इंगोले, प्रफुल गुप्ते, गुलाबराव थोरात, बाबुराव इंगळे, गजानन डेहनकर, अजाबराव टाले यांनी सक्रिय सहभाग घेऊन घरोघरी संपर्क केला.
कार्यक्रमाचे संचालन हेमंत देशमुख तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष जयंत इंगोले यांनी केला.
अधिक वाचा : अटकळी येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी रमेशभाऊ जामाजी दारोकार ह्यांची बिनविरोध निवड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola