दहिहांडा (शब्बीर खान): पन्नास हजाराचा चेक अनादर प्रकरणी न्यायालयाने आरोपीची २२ जानेवारीपर्यंत कारागृहात रवानगी केली आहे.
न्यायालयीन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय जेठानंद चंदानी सिंधी वॅâम्प यांच्याकडून हिरालाल पुरूषोत्तम आसवानी याने ५० हजार रूपये उधारीवर घेतले होते. यामध्ये ओरियंटल बँकेचा धनादेश दिला असता या चेकचा अनादर झाला. याप्रकरणी चंदानी यांनी अॅड. ए.जी. चांदवानी यांच्या माध्यमातून कलम १३८ नुसार नोटिस पाठविली. याप्रकरणी आठवे प्रथम न्यायाधीश घुगे यांनी दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून निकालाची तारीख घोषित केली.
या निकालाच्या सुनावणीवेळी आरोपी हिरालाल आसवानी फरार झाला होता. त्याला अटक झाली असून, न्यायालयाने आरोपीची २२ जानेवारीपर्यंत कारागृहात रवानगी केली आहे.
अधिक वाचा : गोवंशाचे मांस पकडले!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola