तेल्हारा (प्रतिनिधी) : लोकजागर मंच ह्या सामाजीक चळवळीच्या वतीने उमरी येथे काल सांयकाळी ग्राम बैठकीचे आयोजन करण्यात आले.या वेळी लोकजागर मंच चे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ गावंडे यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण,शेतकरी यांच्याशी संवाद साधत कृषी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा व शेती निगडित जोड व्यावसाया संदर्भात सांगोपांग चर्चा केली.
दिवसेंदिवस कौटुंबिक विभाजनाने शेती कमी होत आहे. व शेतीवर उपजीविका करणाऱ्यांची संख्या जास्त आणी शेतीचे क्षेत्रफळ कमी व उत्पन्नाला मर्यादा आल्या आहेत. त्या करीता शेतीवरील भार कमी झाला पाहिजे शेतीपूरक जोडधंदे, शिक्षण व उद्योग व्यावसायाच्या माध्यमातून हा भार कमी केला पाहिजे. प्रत्येक समस्या ही आपल्यासोबत तीचे समाधान घेऊन आपल्यापुढे येत असते. आपल्याजवळ सकारात्मक दृष्टीकोन असला तर कुठल्याही समस्येचे आपण निराकरण करू शकतो.
सरकार वा व्यवस्था आपल्यासाठी काही करेल याची वाट पाहण्यापेक्षा लोकसहभागातून आपण आपल्या गावासाठी एकत्र आले पाहिजे.आमच्या सोबत जे जे गाव असे एकत्र आलेत त्यागावात 50 टक्के लोकसहभाग व 50 टक्के लोकजागर ह्या तत्वावर शेत तिथे शेतरस्ता व पाणी फाउंडेशन च्या माध्यामातून जलसंधारणची कामे झालेली आहेत. यावर्षी संपूर्ण गावाने पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा अशी विनंती केली. आपल्या गावातील पाणीसाठा संपल्यास अमिरखानचे कुठलेही नुकसान होणार नाही.
पाण्याचे महत्व आपल्याला शेतकरी नसणाऱ्या अमिरखान कडून समजून घ्यावे लागते ह्या पेक्षा आपलं दुर्दैव कोणते?असंही ते म्हणाले. स्वतःच्या प्रपंचासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांची फळी निर्माण झाली पाहिजे मी लोकजागर च्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी सदैव आहे. आपल्या भागात शेतीपूरक पारंपारिक दुग्ध व्यावसायासाठी भौगोलिक सोयी सुविधा मोठ्याप्रमाणात असून ह्या व्यावसायातून मोठी अर्थक्रांती होऊ शकते. त्याकरिता तरुण युवा पिढीने पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार यांनी लोकजागरची भूमिका व लोकजागर करीत असलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली. ग्रामसभेला गावाचे सरपंच अरुण पा मोहोड,माणिकराव मोरे,सतीश मोहोड, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक नरेंद्र काकड, अंबादास खडसान, प्रमोद खोडके, सोपान मोहोड, ज्ञानेश्वर खडसान, भीमराव तायडे, विठ्ठल धुरंधर, मंगेश मोरे, पवन ठोसर शुभम वाघ, लोकजागर मंच चे अनंतराव सपकाळ, राजेश गावंडे, तेल्हारा ता अध्यक्ष संदीप गावंडे, आकाश बरेठिया, योगेश जायले, अमित डोबाळे, विनोद शित्रे, जाकीर खान, श्रीजीत गडम,आनंद रोडे पाटील, मुजाहिद खान, हरिभाऊ कुकडे, गणेशराव बोडखे,शिवा दिंडोकार व बहुसंख्येने गावकरी उपस्थीत होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola