अकोला : अकोला महानगरपालिका मालमत्ता जप्ती पथकाने थकीत करापोटी शहरातील संत कबीर नगर, स्टेशन रोड येथील शमुकुंद सीताराम बाळखडे यांची मालमत्ता क्र. सी – २ – ४६२ हे दुकान सील केले. त्यांच्याकडे सन २०१६-१७ पासून ते २०१८-१९ पर्यंतचा एकूण ३१,४९६/- मालमत्ताकर थकीत आहे. त्यांना थकीत कराचा भरणा करण्यासंदर्भात मनपा प्रशासनाकडून वारंवार सूचना व नोटीस
अकोला महानगरपालिका मालमत्ता जप्ती पथकाने थकीत करापोटी शहरातील संत कबीर नगर, स्टेशन रोड येथील शमुकुंद सीताराम बाळखडे यांची मालमत्ता क्र. सी – २ – ४६२ हे दुकान सील केले.त्यांच्याकडे सन २०१६-१७ पासून ते २०१८-१९ पर्यंतचा एकूण ३१,४९६/- मालमत्ताकर थकीत आहे. त्यांना थकीत कराचा भरणा करण्यासंदर्भात मनपा प्रशासनाकडून वारंवार सूचना व नोटीस दिल्यावरही त्यांनी कराचा भरणा केला नाही.
त्यामुळे मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये, उपयुक्त सुमंत मोरे, कर अधीक्षक विजय पारतवार व सहायक कर अधीक्षक देवेंद्र भोजने यांच्या मार्गदर्शनात मुकुंद सीताराम बाळखडे यांची मालमत्ता असलेले दुकान सील करण्यात आले.
या वेळी महापौर विजय अग्रवाल व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी नागरिकांनी आपला थकीत तसेच चालू मालमत्ता कराचा भरणा वेळेवर करून मालमत्ता जप्ती सारखी अप्रिय घटना टाळून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन केले.ही कारवाई मालमत्ता जप्ती पथक प्रमुख सै.मुमताज अली, वॉरंट दरोगा मोहन घाटोळ, वसुली लिपिक सुनील डोईफोडे, तेजराव तायडे, सुरक्षा रक्षक श्रावण वाहाने, शोभा पांडे आदींच्या पथकाने केली.
अधिक वाचा : अकोला एमआयडीसीत गुटखा जप्त, एसपी च्या विशेष पथकाची कारवाई