सिडनी : विराट कोहली च्या नेतृत्त्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली आहे. सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आली असून कोहली ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली आहे. तब्बल ७२ वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका विजयाचा पराक्रम केला आहे.
सिडनी कसोटीत सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ सुरूच होऊ शकला नाही. उपहारानंतरही पावसाने विश्रांती न घेतल्याने सामनाधिकाऱ्यांनी सामना अनिर्णित म्हणून जाहीर केला आणि भारतीय संघाने चार सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. सिडनी कसोटीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या डावात ६२२ धावांचा डोंगर उभा केला होता. तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांत गुंडाळून फॉलोऑन दिला. भारतीय संघ चौथ्या कसोटीतही मजबूत स्थितीत होता.
It’s been such a wonderful few weeks in Australia, something that has become historic! Every second the team put has paid off so well. Thank you all for the love and wishes pouring in. It’s been an overwhelming day, a day I’ll cherish for the rest of my life! #TeamIndia #INDvAUS pic.twitter.com/oQAqTCVtHE
— cheteshwar pujara (@cheteshwar1) January 7, 2019
मात्र, खेळाच्या चौथ्या दिवसापासून वरुणराजाच्या आगमानामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. रविवारी दिवसभरात केवळ २५ षटकांचा खेळ होऊ शकला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या बिनबाद ६ धावा अशी होती, तर भारतीय संघ ३१६ धावांनी आघाडीवर होता.
अधिक वाचा : पदापर्णाच्या कसोटीत मयांक अग्रवाल चा विक्रम
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola