मेलबर्न : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मयांक अग्रवाल ने पहिलाच सामन्यात एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला. मयांक अग्रवाल ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकवणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला.
तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया व्यवस्थापनाने नवीन सलामीची जोडी मैदानात उतरवली. मयांक अग्रवालने पहिल्याच सामन्यात आपली छाप सोडत शानदार अर्धशतक झळकावले. पदापर्णाच्या पहिल्याच डावात अर्धशतक झळकवणारा मयांक हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. याआधी दत्तात्रेय फडकर यांनी १९४७-४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटीत ५१ धावांची खेळी केली होती. मयांक अग्रवालने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच डावात ७६ धावांची खेळी केली. पदार्पणाच्या सामन्यात भारताबाहेर सर्वाधिक धावा काढणारा भारतीय फलंदाज म्हणून मयांकच्या खेळीची नोंद झाली.
अधिक वाचा : जसप्रीत बुमराह आधुनिक क्रिकेटमधला चतुर गोलंदाज – ग्लेन मॅकग्रा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola