पातूर(सुनिल गाडगे) : शेतकरी जागर मंचच्या वतीने पातूर तहसील समोर एक दिवसीय धरणे आंदोलन,शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आले. शासनाने अकोला जिल्ह्यातील पातूर,अकोट हे दोन तालुके दुष्काळ जाहीर न केल्यामुळे पातूर शेतकरी जागर मंचच्या वतीने पातूर तहसील समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनामध्ये पातूर तालुका दुष्काळ जाहीर करावा, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना योग्य दाबाची वीज सलग आठ तास देण्यात यावी पातूर तालुक्यातील मुद्रा लोनची प्रकरणे तात्काळ निकाली काढावी,सिंचन विहीर फळबाग योजनेचे मिळणारे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरीत जमा करावे या आषयाचे निवेदन पातूर तहसीलचे नायब तहसीलदार खुळे यांना देण्यात आले या वेळी बाळापूर विधानसभा संघाचे आमदार श्री बळीरामजी सिरस्कार,गजानन हरणे, चे प्रशांत गावंडे,जयसिंग जाधव, योगेश इंगळे,विलास देवकर, गजानन गाडगे, अजय बगाडे,महेश देवकर,परशराम उंबरकार ,सुरेंद्र उगले ,अंबादास देवकर ,आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
अधिक वाचा : पातूर येथे दुष्काळातून समृद्धी कडे चित्र प्रदर्शनाचे उदघाटन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola