तेल्हारा (विकास दामोदर)- भारीप बहुजन महासंघाचे नेते अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रात फुले , आंबेडकर विद्वत्त सभा कार्य करत आहे . या विद्वत्तसभेच्या माध्यमातून SC , ST , VJNT , OBC तसेच अल्पसंख्याक प्रवर्गातील शिक्षित बुद्धिजीवी वर्गाला संघटित करून शैक्षणिक , आर्थिक न्यायासाठी जन आंदोलन उभारल्या जानार आहे. या विद्वत्त सभेच्या प्रमूख मागण्या पुढील प्रमाणे असतील.
१)विद्वत्त सभेच्या वतीने बेरोजगारांना रोजगार हमी योजना सुरू करण्यात यावी.
२)प्राथमिक शिक्षकांची अशैक्षणिक कामे काढून टाकावी.
३)मागासवर्गीयांचा नोकरीतील बेकलॉग भरण्यात यावा.
४)CBSE पेटर्न प्राथमिक शाळेपासून सुरू करण्यात यावा.
५)भारतीय संविधानाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा.
६)वन नेशन वन एजुकेशन म्हणजेच एक समान शिक्षण पद्धती आणि मोफत शिक्षण पद्धती असावी.
७)शिक्षणाचे खाजगीकरण थांबवण्यात यावे.
८)सरकारी सेवेतील जागा कंत्राटी पद्धतीने न भरता पूर्ण वेळ भरण्यात याव्या.
९)जुनी पेंशन योजना सुरू करण्यात यावी .ई मागण्यांना घेवून विद्वत्त सभा जनआंदोलन उभारण्यात येणार आहे , असे प्रतिपादन फूले आंबेडकर विद्वत्तसभेचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रा.विजय आठवले यांनी तेल्हारा येथे पत्रकार परिषदेत केले सदर पत्रकार परिषदेत खालील पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा.डॉ.बाळकृष्ण खंडारे -जिल्हा कोषाध्यक्ष प्रा.सुरेश मोरे -जिल्हा उपाध्यक्ष प्रा.दिवाकर सदांशिव -जिल्हा सदस्य तेल्हारा येथील भारत दामोदर सर , सिद्धार्थ शामस्कर सर , इंगळे सर , मिलिंद खिराडे सर , वर्घट सर , प्रकाश तायडे सर प्रा.विकास दामोदर , बंडू वरठे , धीरज वरठे , वाकोडे सर , अँड.मंगेश बोदळे ई.सह अनेक विद्वान लोक उपस्थित होते शेवटी तेल्हारा तालुक्यातील तसेच तमाम पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या विद्वत्त सभेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
अधिक वाचा : तेल्हारा येथे संताजी महाराजांची पुण्यतिथी साजरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola