अकोला(प्रतिनिधी)- विदर्भ कार्टुनिस्ट असोसिएशन आणि सेंट जॉन हायस्कूल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अमिताभ बच्चन यांच्या 76व्या वाढदिवसाचे निमित्त साधून भारतातील तसेच इंडोनशिया, द. आफ्रिका आणि इराक मधील व्यंगचित्रकारांनी Big B @ 76 या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यात प्रामुख्याने अमिताभ बच्चन यांची अर्कचित्रे, त्यांच्यावरील व्यंगचित्रे, त्यांचे पेन्सील स्केच व पोर्टेट यांचा समावेश होता. याप्रसंगी मी श्री अमिताभ बच्चन यांना त्यांचे वडील श्री हरिवंशराय बच्चन यांचे स्केच, त्यांच्या सुलेखनबद्ध केलेल्या कवीता, अमिताभ बच्चन यांचे अर्कचित्र, पेन्सील स्केच, पोर्टेट, त्यांच्यावर केलेले व्यंगचित्र तसेच त्यांच्या गाजलेल्या संवादांची केलेली ग्राफिटी या सर्वांचे संकलन पुस्तकरुपात भेट केले. ज्याचे अमिताभ बच्चन यांनी कौतुक केले तसेच श्री हरिवंशराय बच्चन यांच्या पेन्सील स्केचवर स्वाक्षरी केली. यावेळी सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे हेही उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola