बाळापूर : स्व. हरिभाऊ गव्हाणकर माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे, यांच्या समतादूत कुमारी प्रज्ञा प्रभाकर खंडारे व स्मिता विठ्ठल राऊत यांनी कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती हि मोठया उत्साहात साजरी केली.
या वेळी कुमारी प्रज्ञा खंडारे यांनी विध्यार्धाना अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून सावित्रीबाई यांच्या विचारांची नितांत गरज आहे. महाकालीन अत्याचार या विषयावर व तसेच महिलांनी कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला प्रतिकार करणे गरजेचे आहे. असे स्पष्ट केले.
समतादूत प्रकल्पाअंतर्गत समाजात जनजागृती करायचे कार्य गेल्या काही वर्षा पासून सुरु आहे. यावेळी त्यांनी समतादूत बार्टी (पुणे) मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे मॅडम व विभागीय सहायक अमरावती श्री. राहुल कराळे सर यांचे खूप महत्वाचे आहे हे स्पष्ट केले. याच प्रसंगी कुमारी स्मिता राऊत यांनी आपले विचार मांडले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी किती यातना सहन करून आपणास शिक्षणाचे द्वारे खुले केले. व त्यांची जाणीव प्रत्येक महिलेने घेणे गरजेचे आहे. हे स्पष्ट केले.
सादर कार्यक्रमात लाभलेले माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक अरुण दादकर यांनी यांनीही अध्यक्षीय भाषण करून मुलांनी आपल्या कर्तुत्वाला जागृत करून पुढे जायला पाहिजे असे सांगितले. या प्रकरणी स्वर्गीय हरिभाऊ गव्हाणकर, श्री अंनता डिवरे सर, धनंजय निकुसे सर , सुभाष खोले सर, श्री चव्हाण, कवलकार सर, वानखेडे सर व तसेच विद्यार्धी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
अधिक वाचा : बाळापूर तालुक्यात रिलायन्स कॅन्सर केअर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola