मुंबई : एसटी महामंडळाच्या 1 एप्रिल 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम हप्त्यामध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.
राज्यातील एसटी महामंडळाच्या सुमारे 13 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून त्यांना अंदाजे 240 कोटी रुपयांची फरकाची रक्कम एकरकमी देण्यात येईल. मंत्री श्री. रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृहात आज महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, एसटीचे महाव्यवस्थापक माधव काळे, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी अशोक फळणीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मंत्री श्री. रावते यांनी जून 2018 मध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 4 हजार 849 कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केली होती. या वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 1 एप्रिल 2016 पासून देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता.
एप्रिल 2016 ते जून 2018 या दरम्यानच्या काळातील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना हप्त्यामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आाला होता. पण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही फरकाची रक्कम हप्त्यांमध्ये न देता ती एकरकमी देण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना मंत्री श्री. रावते यांनी यावेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या निर्णयामुळे महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जून 2016 नंतर आतापर्यंत महामंडळाचे सुमारे 13 हजार कर्मचारी निवृत्त झाले असून त्यांना अंदाजे 240 कोटी रुपयांची फरकाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही उर्वरित फरकाची रक्कम सेवानिवृत्तीनंतर एकरकमी देण्यात येणार आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 2