अकोला : आज अकोला महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी स्वच्छता सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने मनपा आरोग्य विभागाची आढावाबैठक घेतली. स्वच्छता सर्वेक्षणाच्या दृष्टीने आरोग्य विभागातर्फे सुरू असलेल्या उपक्रमांची आणि नियोजनाची त्यांनी माहिती जाणून घेतली.
बैठकीमध्ये मनपा उपायुक्त सुमंत मोरे, सहायक आयुक्तपूनम कळबे, क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, राजेंद्र घनबहादुर, वासुदेव वाघाडकर, दिलीप जाधव, आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर, अ.मतीन यांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनीअकोला महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून शहरातील नागरिकांकडून घेतलेल्या करामधून कर्मचा-यांचा पगार करण्यात येत असतो.
मनपा कडून शहरातील नागरिकांना मुलभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असते. या कामामध्ये केलेला कामचुकारपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही,असा इशारा दिला. संबंधितांचे काम पूर्ण न झाल्यासकुठलेही कारण ऐकले जाणार नाही. ज्यांच्याकडे ज्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये आपले काम पूर्ण करणे आवश्यक आहे. असे न झाल्यास मानसेवा व कंत्राटी कर्मचाऱ्यांनाकाढण्यात येईल तसेच आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांवरकायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर करणा-या व्यावसायिंकांवर दंडात्मक कारवाई मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या वस्तू वापरणे, हाताळणेपूर्णपणे बंद व्हायला हवे अशीही सूचना त्यांनी केली.
मनपातील सर्व कर्मचा-यांनी एका कुटुंबाप्रमाणे काम करणे तसेच आपले काम हे संवेदनपुर्ण आणि जबाबदारीने पार पाडणे अपेक्षित आहे, असे सांगितले. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत शहरामध्ये दैनंदिन होणा-या कामामध्ये अधिक लक्ष घालण्याच्यातसेच स्वच्छतेचे काम जास्त प्रभावीपणे करण्याच्यासूचना मनपा उपायुक्त सुमंत मोरे यांनी केल्या. श्री श्री रविशंकर संस्थेचे मनोज शर्मा यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. बैठकीला सर्व आरोग्य निरिक्षक उपस्थित होते.
अधिक वाचा : लोकशाही पंधरवाडादरम्यान मनपा करणार मतदार नोंदणीसाठी जनजागृती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola