अकोला : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २६ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान अकोला मनपा क्षेत्रामध्ये लोकशाही पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. ‘जागरुक मतदार, लोकशाहीचा आधार’ हे ब्रीद घेऊन संपूर्ण पंधरवाड्यात मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
यासंदर्भातील नियोजनाच्या दृष्टीने उपायुक्त सुमंत मोरे यांच्या अध्यक्षसतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाविद्यालयीन प्रथम वर्षांमध्ये शिकणाऱ्या विध्यार्थ्यांची मतदार यादीमध्ये नोंद करण्याचा उपक्रम राबविणे, ज्या भागात महिला, अल्पसंख्याकांच्या मतदानाची टक्केवारी कमी आहे, त्याकरिता विशेष मोहीम राबवून जनजागृती करणे, निवडणूक आयोगाद्वारे सुरू असलेल्या मतदार यादी नूतनीकरणाच्या कार्यक्रमामध्ये १८ ते १९ वयोगटातील नवीन मतदाराची नोंद करून घेणे, निवडणुकीचे महत्त्व विषद करून मतदानाची टक्केवारी वाढविणे, शहरातील मतदारांना ७३ व ७४ व्या घटना दुरुस्ती बाबत माहिती देणे, राज्य निवडणूक आयोग हे शासनापेक्षा स्वतंत्र असल्याचे व त्याबाबतची सविस्तर माहिती मतदारांना देणे, या सर्व कामाकरिता शहरातील समाजसेवी संस्था, इतर संस्था, महिला बचत गटाचा सहभाग घेऊन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करणे यासंदर्भात चर्चा करून मनपा उपायुक्त सुमंत मोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.
यावेळी सहआयुक्त डॉ. दिपाली भोसले, प्रशासन अधिकारी कुणाल राईकवार , नगर सचिव अनिल बिडवे , अरुण पाचपोर, रंजना घुले,कैलास ठाकूर, भरत शर्मा, प्रवीण मिश्रा, किशोर सोनटक्के, जी.एच. मुळे उपस्थित होते.
अधिक वाचा : उपमहापौर शेळके यांनी केले आयुक्तांचे स्वागत
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola