पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस स्वस्त करून, ग्राहकांना नव्या वर्षात भेट दिली आहे. अनुदानित सिलिंडरचे दर 5.91, तर विनाअनुदानित सिलिंडरचे दर 120.50 रुपयांनी घटविण्यात आले. पेट्रोल, डिझेलचे भावसुद्धा वर्षातील नीचांकी पातळीवर आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. या घडामोडींमुळे इंधन आणि एलपीजीचे दर पेट्रोलियम कंपन्यांनी स्वस्त केले आहेत. एलपीजी दरात या महिन्यात दोन वेळा कपात करण्यात आली आहे. या आधी एक डिसेंबर रोजी अनुदानित एलपीजीच्या दरात 6.52, तर विनाअनुदानित गॅसमध्ये 133 रुपयांची कपात करण्यात आली होती. जून महिन्यापासून कंपन्यांनी एकूण सहा वेळा गॅसच्या दरात घट केली आहे. जूनपासून अनुदानित गॅसच्या किमतीमध्ये 14.13 रुपयांनी घसरण झाली आहे.
कच्च्या तेलाच्या दरातील घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्यात झालेली वाढ, यामुळे एलपीजीच्या दरात कपात करण्यात आल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अनुदानित गॅसवरील अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. दरातील चढ-उतारानुसार अनुदानाच्या रकमेमध्येही चढ-उतार करण्यात येतात. दर कपातीनंतर दिल्लीमध्ये अनुदानित एलपीजीचे दर 500.90 रुपयावरून 494.99 रुपयापर्यंत खाली आहेत.तर विनाअनुदानित गॅसचे भाव 809 रुपयावरून 689 रुपये झाले आहेत.
अधिक वाचा : कर्जमाफीच्या नावावर काँग्रेस शेतकऱ्यांशी खोटं बोलतेय – नरेंद्र मोदी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola