अकोट (प्रतिनिधी): तालुक्यातील अल्पसंख्याक समाज तसेच अल्पसंख्यांक कर्मचारीचे प्रलंबित प्रश्न आणि समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात अशी सूचना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा ना ज.मो. अभ्यंकर यांनी दिली अकोट पंचायत समिती सभागृह येथे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ना ज.मो. अभ्यंकर यांनी अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींच्या भेटी व त्यांच्या तक्रारीबाबत यांची स्वतंत्र बैठक घेऊन अल्पसंख्यकांच्या समस्या जाणून घेतल्या.
सभागृहात झालेल्या या बैठकीस अकोट चे तहसीलदार विश्वनाथ घूगे गटविकास अधिकरी बाबाराव पाचपाटील अकोट शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष महाल्ले दहीहंडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख आकोट नगर परिषदचे उपाध्यक्ष तथा शासकीय सदस्य जिल्हा अल्पसंख्याक कल्याण विकास समिती अबरार खाँ शमशेर अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रूपनर शासकीय दिव्यांग समितीचे सदस्य सय्यद इम्रान अली काँग्रेस असंघटित कामगार सेलचे प्रदेश अध्यक्ष बद्रुज्जमा अकोट नगर परिषदचे रावणकर हे मंचकावर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी अल्पसंख्यक आयोगाचे उपाध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांचा विभाग निहाय आढावा घेतला ते म्हणाले अल्पसंख्याकांच्या विकाससाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत असून ही ही योजना अधिक गतीमान करा तसेच अल्पसंख्यांक समाजासाठीच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा संबंधित अधिकाऱ्यांना अशी स्पष्ट सूचना यांनी दिल्या सदर सभेमध्ये अकोट नगर परिषद उपाध्यक्ष अबरार खाँ यांनी घरकुल योजने बाबत समस्या मांडल्या मो. बद्रूज्जमा यांनी अल्पसंख्यांक भागामध्ये स्वच्छतेची दूरदर्शे बाबत समस्या मांडल्या अज़हर शेख यांनी नगर परिषद अकोट येथे उर्दु माध्यमाच्या १३ शिक्षकांची रिक्त जागा भरण्याबाबत मागणी केली मो जूबेर सर यांनी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बाबत येणाऱ्या अडचणी समस्या मांडली सय्यद पत्रकार अकोट यांनी अल्पसंख्यक भागातील स्वच्छता व आरोग्य रस्ते नाही मुलभुत सुविधा नाही आणि शिक्षण मध्ये सवलत नाही याबाबत समस्या मांडली मो आरिफ यांनी शाळा क्र. ६ ची नवीन इमारत बांधकाम व लाईट व्यवस्था करणेबाबत समस्यांना मांडली तसेच नैशनल उर्दु टीचर्स युनियनचे राज्य कार्याध्यक्ष मुदस्सीर अहमद यांनी विषय सन २०१९ मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्तिचे जयंती पुण्यतिथी व अन्य राष्ट्रीय दिनसाजेरे करण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या दि २६ डिसेंबर रोजी निर्गमित शासन निर्णय सोबत जोडलेली कार्यक्रमांची यादीमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिवस मौलाना अबुल कलाम आजाद यांची जयंती व अल्पसंख्यांक दिवसाचा समावेश नाही करण्यात असुन खंत व्यक्त केले तसेच अल्पसंख्याक शिक्षकांची विविध समस्या व शिक्षक पात्रता परिक्षा बाबत चर्चा केले मा. महादेव यांनी नगर परिषद शिक्षकांच्या विनाकारण जिल्हा बाहेर केलेल्या बदल्या या बाबतीत निवेदन दिले या निवेदनावर कास्टट्राईब शिक्षक संघटनेचे वानखडे सर नवलकर सर सुभाष शिरसाट सर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत शिक्षक सेनाचे तालुका अध्यक्ष आढे व इतर सदस्य यांनी मा ना अभ्यंकर यांचा शाल व श्री.फळ देऊन सत्कार केला व समस्या मांडल्या. या सभेत अल्पसंख्यांक समाजाचे लोकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेचे सूत्रसंचलन अकोट चे नायब तहसीलदार राजेश गुरव यांनी केले सभेच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत इंगोले सिद्धार्थ खुळे सिद्धांत तायडे आसिफ शाह ढोरे गजानन खोल्हे यांनी परिश्रम घेतले.
अधिक वाचा : अकोट फैलकडील अतिक्रमणाचा सफाया
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola