अकोट : अकोला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील विविध परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर आता अकोट फैलकडे लक्ष केंद्रीत केले आहे. अकोट फैलमधील चिकनची व मच्छी मार्केटमधील अतिक्रमित दुकाने तोडण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील अतिक्रमण धारकांची दुकाने व भाजी विक्रेत्यांची दुकाने तोडून अतिक्रमित जागा मोकळी केली. यापूर्वी अकोला महानगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सिटी कोतवाली ते गांधी रोड वरील अतिक्रमित कपडे विक्रेत्यांचे अतिक्रमण काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह ते फतेह अली रोड वरील फळविक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण काढले.
रहदरीस अडथळा निर्माण करणार्या अतिक्रमण धारकांना विरुद्ध कारवाई केली.तसेच जुने बस स्टँड, टॉवर चौक ते अकोला क्रिकेट क्लब जवळील स्वेटर विक्रेत्यांचेही अतिक्रमण काढले. ही कारवाई मनपा आयुक्त यांच्या आदेशावरून मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र धनबहादुर यांच्या मार्गदर्शनात सहायक अतिक्रमण अधिकारी नरेश बोरकर, बडोणे, सुरक्षा रक्षक सैय्यद रफीक, विनोद वानखेडे, शैलेंद्र गोपणारायण, अरबट, ठाकरे, काळे, नाकट, कावळे, डोंगरे, खंदारे आदींनी पार पडली.
अधिक वाचा : अकोट वाहतूक पोलीस दादांची माणुसकी हरवलेल्या चिमुकलीला सुखरूप पोहचवले घरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola