अकोट (प्रतिनिधी)- अकोट वाहतूक पोलीस कर्मचारी पोलीस विभागाला अपवाद ठरत असून एकीकडे अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत आदिवासी मुलाचे हत्याकांडावरून शीतयुद्ध सुरू असताना दुसरी कडे अकोट वाहतूक पोलिसांनी एका हरवलेल्या आदिवासी चिमुकलीला सुखरूप तिला तिच्या घरी पोहचवून पुन्हा एकदा या वाहतूक पोलिसांनी अकोटकरांकडे एक आदर्श निर्माण केला आहे.
अकोट पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस जगदीपसिह ठाकूर,अनिल लापूरकर,गणेश फोकमारे हे आपल्या कर्तव्यावर शिवाजी चौक येथे कर्तव्य बजावत असतांना एक चार ते पाच वर्षांची चिमुकली रडतांना त्यांच्या निर्दशनास आली.यावेळी या वाहतूक पोलिसांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना वाहतूक पोलिसांची भाषा उमजेना मात्र ती चिमुकली आदिवासी भाषा बोलत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना ती चिमुकली आदिवासी असल्याचे कळले.वाहतूक पोलिसांनी ही बाब ठाणेदार संतोष महल्ले यांना सांगितले.
शहरात दुचाकीवरून त्या चिमुकलीला घेऊन पेट्रोलिंग करीत असतांना शहरातील सियाराम रेडिमेड दुकानाजवळ तिच्या आजीने त्या चिमुकलीच्या आजीने तिला ओळखले.त्यावरून त्या चिमुकलीची ओळख पटली सदर चिमुकलीचे नाव इशियानी रमेश भिलावेकर असे असल्याचे समजले त्यानंतर सदर चिमुकल्या इशाईनीला तिच्या घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आले. याआधी सुद्धा या वाहतूक पोलिसांनी बऱ्याच हरवलेल्या चिमुकल्यांना सुखरूप घरी पोहचवण्याचे काम केले आहे तर गरीब कुटूंबातील चिमुकल्यांना कपडे वाटप मिठाई वाटप करून माणुसकीचा परिचय करून दिला आहे.
अधिक वाचा : अमानुष मारहाणीमध्ये सात वर्षीय मुलाच्या मृत्यू प्रकरणी ३०२ सह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल; २ जणांना अटक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola