अकोट- अकोट-हिवरखेड मार्गावरील फिजा हॉटेलमध्ये अनेक महिन्यांपासून कार्यरत कृष्णा गणेश जांभेकर(वय ७) याला अमानुष मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना ४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली. न्यायालयाने आरोपींना १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.याप्रकरणी अकोट ग्रामीण पोोलिसानी अट्रोसिटीचा गुन्हा सुद्धा यामध्ये दाखल केला आहे.
ग्रामीण पोलिसांनी आयोजित पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती देण्यात आली. मध्य प्रदेशातील नेपानगर येथील गणेश जांभेकर हा आपला मुलगा कृष्णा सोबत फिजा हॉटेल येथे काम करायचा. गत काही महिन्यांपासून गणेश जांभेकर आपल्या गावी कृष्णाला सोडून निघून गेला. त्यानंतर कृष्णावर अत्याचाराची कुऱ्हाड कोसळली.
फिजा हॉटेलचे मालक अकबर खान यांची दोन मुले सलीम खान अकबर खान(वय ३५), फिरोज खान अकबर खान (वय४०) हे कृष्णाला छोट्या मोठ्या कारणावरून अनन्वित छळ करायचे. त्यामुळे कृष्णाच्या शरीरावर अनेक ठिकाणी इजा झाल्या होत्या.
असाच प्रकार ४ डिसेंबर रोजी घडला. सलीम व फिरोज याने कृष्णाला बेदम मारहाण केली. या मध्ये त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या कृष्णाला सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच कृष्णाने जगाचा निरोप घेतला. या प्रकरणी अकोला येथील सिटी कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात मारहाणीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते.
अधिक वाचा : आकोट येथील जुगार अड्ड्यावर छापा; ३ नगरसेवक ताब्यात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola