पातूर (सुनिल गाडगे) : सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धा अंतर्गत दुष्कालाटून समृद्धीकडे चित्र प्रदर्शनाचे पानी फौंडेशन च्या वतीने स्थानिक पातूर येथे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते प्रदर्शनाचे उदघाटन प्रकाश तायडे यांनी फित कापून केले यावेळी नायब तहसीलदार खुळे साहेब प्रा, ममता इंगोले ,बीएड कॉलेज चे गोपाल पुरुषोत्तम, पानी फौंडेशन चे जिल्हा समन्वयक नरेन्द्र काकड बिजेएस चे अश्विनी वानखडे, अजय मोरे सिंन्हा महाविद्यालयाचे आहाळे सर आदींची प्रमुख उपस्तीती होती उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले त्यानंतर एच एन सिन्हा, तुळसाबई कावल महाविद्यालयाचे विद्यार्थी व अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनी मध्ये जल संधारणा बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली यानंतर सर्वांना पानीफाऊंडेशन च्या कार्याबद्दल लघुपट दाखविण्यात आले विद्यार्थ्या बरोबर विविध गावातील सरपंच गावकरी आदींनी चित्र प्रदर्शनाला भेट दिली यावेळी पानी फाऊंडेशन चे समन्वयक रवी बोदडे मंगेश लोडम, प्रशांत भटकर,तसेच पाणी फाऊंडेशन चे तांत्रिक प्रशिक्षक पुरुषोत्तम पाचपोर, शुभम अंभोरे, शिवहरी टेके, कृष्णा आवटे, हितेश सरप, सामाजिक प्रशिक्षक तुळशीराम लोथे आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
अधिक वाचा : पातूर येथील युवकांची महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी निवड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola