अकोला : वेळोवेळी सूचना आणि नोटीस देऊनही लाखोंमधील कराचा भरणा न करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध मनपाच्या जप्ती पथकाने कारवाई केली. दोन टॉवर आणि एक दुकान मनपाने सील केले.
अकोला महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या राम नगर येथील सुरेश पाटील, भाडेकरी जे. टी. एल. इन्फ्रास्ट्रचर यांच्याकडे १ एप्रिल २०१७ पासून १,०७,८०८/- रुपये इतका मालमत्ता कर थकीत आहे. व्ही. एच. बी. कॉलोनी येथील अलकनंदा ढोरे, भाडेकरी जे. टी. एल. इन्फ्रास्ट्रचर यांच्याकडेसुद्धा १ एप्रिल २०१७ पासून १,३९,७८९/- रुपये इतका मालमत्ता कर थकीत आहे. पाटील मार्केट लहान उमरी येथील भरत सेठ यांच्याकडे सन २००७ पासून ३५,२५३/- रुपये इतका मालमत्ता कर थकीत आहे.
कराचा भरणा करण्यासंदर्भात मनपा प्रशासनाने वारंवार सूचना व नोटीस दिल्यावरही उपरोक्त व्यावसायिकांनी कराचा भरणा केला नसल्यामुळे मनपा उपायुक्त सुमंत मोरे यांच्या आदेशान्वये व कर अधीक्षक विजय परातवार यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत जे. टी. एल. इन्फ्रास्ट्रक्चरच्या दोन टॉवरवर तसेच दिपेन स्टील या दुकानावर सीलची कार्यवाही करण्यात आली. अकोला मनपा क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या थकीत कराचा भरणा वेळेवर करून सील जप्तीसारख्या अप्रिय कारवाई टाळाव्या, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा : अकोला जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी विद्यार्थ्यांसोबत चाखली खिचडी चव
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola