व्याळा (प्रतिनिधी) : काम करण्याच्या आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शालेय पोषण आहाराच्या खिचडीचा आस्वाद घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय हे मंगळवारी दुपारी मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ)चा आढावा घेण्यासाठी व्याळा येथील जिल्हा परिषद शाळेत आले होते. त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उप जिल्हाधिकारी वैशाली देवकर आदी अधिकारी मंडळीही होती. शाळेत प्रवेश केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना शाळेतील मुले शालेय पोषण आहार घेत असताना दिसले.
जिल्हाधिकाऱ्यांनी थेट आपला मोर्चा विद्यार्थ्यांकडे वळवला आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत रांगेत बसून खिचडीचा आस्वादही घेतला. विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना विविध प्रश्न विचारले. जिल्हाधिकाºयांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे म्हणून साधलेल्या संवादाचे पालकांसह ग्रामस्थांनी आभार मानले.
अधिक वाचा : मतदार यादी शुध्दीकरण मोहिम अंतर्गत जिल्हाधिकारी यांनी घेतला व्याळा येथे आढावा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola