तेल्हारा(प्रतिनिधी)- शहरातील न प हद्दीतील जलतरण तलाव हा चिमुकल्या साठी जीवघेणा ठरत असून दि १६ डिसेंबर रोजी प्रताप चौक येथील आठ वर्षीय चिमुकल्याचा सदर तलावात पडल्याने जीव जाता जाता वाचला या बाबत अवर अकोला न्युज ने बातमी प्रकाशित केल्याने न प विरोधी नगरसेविका सौ अरुणा मंगेश ठाकरे यांनी दखल घेतली.
आज दुपारी स्वखर्चाने ओसाड पडलेल्या सदर तलावातील पाणी काढण्यासाठी पुढाकार घेऊन त्या मधील पाणी काढले मात्र पाणी काढत असतांना त्यांना तांत्रिक अडचणी आल्याने पूर्णपणे तलावातील पाणी निघू शकले नाही.नगरसेविका ठाकरे यांनी न प प्रशासनाला दोन वेळा लेखी स्वरूपात जलतरण तलावबाबत तक्रारी दिल्या असून सुद्धा न प प्रशासनाने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही.जर न प सदस्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात असेल तर न प प्रशासन किती नागरिकांच्या समस्यांबाबत जागरूक आहे हे दिसून येते.या परिसरातील नागरिकांनी सुद्धा बऱ्याच वेळा तोंडी तक्रारी न प व सत्ताधारी नगरसेवकांना दिल्या होत्या मात्र त्यांच्या तक्रारींना कोणी प्रतिसाद दिला नाही.
न प नगरसेविका अरुणा ठाकरे यांनी याबाबत स्वखर्चातून पुढाकार घेतल्याने तसेच तलावातील पाणी काढण्यासाठी उपाययोजना केल्याने तिथे उपस्थित नागरिकांनी त्यांचे आभार मानले.एका विरोधी नगरसेवकाने पुढाकार घेतल्याने सत्ताधाऱ्यांना मात्र चांगलीच चपराक बसल्याचे चित्र आहे.जर विरोधी नगरसेवक लोकांच्या समस्यांसाठी झटू शकतात तर सत्ताधारी का नाही असा सवाल नागरीकाना पडला आहे.
अधिक वाचा : कामगार नोंदणीची मुदतीवाढ करून ज्यादा पैसे घेऊन नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा-कामगार वर्गाची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola