तेल्हारा(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या कडून तेल्हारा न प कार्यालयात कामगार नोंदणी करण्यात येत आहे मात्र नोंदणी करणाऱ्या वेळकाढू धोरणामुळे शेकडो कामगार हे कामगार नोंदणी पासून वंचित असून मुदत वाढ मिळावी तसेच नोंदणी करणारे अधिकारी हे ज्यादा पैसे घेत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी शेकडो कामगारांनी तहसीलदार यांना निवेदन सादर करून मागणी केली.
शासनाकडून काम करणाऱ्या कामगारांची शासन दरबारी व्हावी तसेच कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांना मिळावा म्हणून स्थानिक न प कार्यालयात नोंदणी केंद्र उघडले मात्र त्याचा फारसा फायदा कामगारांना होतांना दिसून येत नाही आहे.कारण शेकडो कामगार रोज सकाळी येथे नोंदणी करीता तालुका भरातून येत असताना नोंदणी अधिकारी कर्मचारी हे वेळेवर येत नसल्याने त्यांना ताटकळत आपली मोलमजुरी सोडून त्यांची वाट बघावी लागते.अशातच कर्मचारी आले तर जेमतेम काही कामगारांची नोंदणी होत असल्याने कामगारांना चकरा माराव्या लागत आहे.कर्मचाऱ्यांचा वेळकाढूपना या कामगारांच्या जीवावर उठला असून शासकीय नियमानुसार नोंदणी फी २५ रुपये व पाच वर्षकरिता वर्गणी फी ६० असे ८५ रुपये सदर नोंदणी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याने घ्यायला हवे मात्र तसे न करता या कामगारांकडून ज्यादा पैसे घेऊन लुबाडणूक होत असल्याचे कामगार वर्ग बोलत आहे.
मुदत वाढ मिळावी व ज्यादा पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी शेकडो कामगारांनी तहसील कार्यालय गाठून आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार तेल्हारा यांना देऊन मागणी केली आहे.
अधिक वाचा : तेल्हारा तालुक्यावर असलेले भाऊसाहेबांचे प्रेम अबाधित ठेवणार -आ.आकाश फुंडकर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola