व्हॉट्सऍप ने आपल्या युजर्सला एक भन्नाट फिचर आणले आहे. व्हॉट्सऍप वर आपल्याला विविध व्हिडीओच्या लिंक्स येत असतात. ते पाहण्यासाठी आपल्याला दुसऱ्या ब्राऊजरवर जावं लागत असे. मात्र, आता व्हॉट्सऍपने यावर तोडगा काढला आहे. आता नव्या अपडेटनुसार व्हॉट्सऍपवर व्हिडीओ पाहता येणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी याची चाचणी करण्यात आली होती. ती आता सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. याला Picture-in-Picture (PIP) (पिक्चर इन पिक्चर) मोड असं म्हटलं जातं आहे. ज्यामुळे व्हॉट्सऍप बाहेर न जात बाकीचे संदेश पाहत आपण त्या लिंकवरील व्हिडीओ व्हॉट्सऍपमध्येच पाहू शकतो.
सध्या हे फिचर फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठीच उपलबद्ध आहे. व्हॉट्सऍप अँड्रॉइडच्या नव्या अपडेटमध्ये (Version 2.18.280) ही सुविधा वापरता येईल. आयफोन आणि टॅबसाठी लवकरच उपलबद्ध होईल अशी शक्यता आहे. सध्या हे फिचर बेटा मोडसाठी उपलबद्ध आहे. युट्युब, फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या बाहेरच्या साइट्सवरील लिंक्स असलेले व्हिडिओ व्हॉट्सऍपमध्येच पाहता येतील. तुम्हाला व्हिडीओचा थंबनेल प्रिव्हयू दिसणारा मेसेज आला कि त्यावर तुम्ही टॅप करून तो व्हिडीओ लगेच पाहू शकता जो प्रथम छोट्या विंडोमध्ये दिसेल जर फुलस्क्रिन पाहायचा असेल तर ती सोयसुद्धा देण्यात आली आहे.
दरम्यान, लवकरच व्हॉट्सऍपवर डार्क मोड जो डोळ्यांचा त्रास कमी करेल, मल्टी शेअर, ग्रुप कॉल शॉर्टकट हे फिचरही लवकरच उपलब्ध होणार आहेत.
अधिक वाचा : Jawa च्या 3 शानदार मोटरसायकल भारतात लाँच
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola