अकोला (प्रतिनिधी) : अकोला रेल्वे स्टेशन परिसरात शुक्रवारची सकाळ वेगळेच चित्र निर्माण करणारी होती. चक्क मनपा पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या हातात झाडू होते. अवघ्या काही तासात त्यांनी रेल्वे स्टेशन परिसराची स्वच्छता केली आणि परिसर चकाचक केला.
स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ सर्वेक्षण–२०१९ च्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. १४) अकोला महानगरपालिका आरोग्य विभागाद्वारे अकोला मनपा उपयुक्त सुमंत मोरे, पूर्व झोन सभापती राजेन्द्र गिरी, महिला व बाल कल्याण सभापती तसेच नगरसेविका सौ सारिका रूपेश जैस्वाल, गट नेते राहुल देशमुख, नगरसेविका सौ. आरती प्रकाश घोगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्व क्षेत्रांतर्गत रेल्वे स्थानक येथे स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या वेळी मनपा उपयुक्त सुमंत मोरे यांनी नागरिकांना आपल्या घरात व प्रतिष्ठानातून निघणारा ओला व सुका कचरा इतरत्र न टाकता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कसे मनपाला सहकार्य करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. तेथील ऑटो रिक्षा चालक, नागरिक तसेच प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
या मोहिमेत मनपा उपायुक्त सुमंत मोरे, सहायक आयुक्त डॉ.दिपाली भोसले, क्षेत्रीय अधिकारी व नगरसचिव अनिल बिडवे, अकोला रेल्वे स्थानकचे प्रबंधक ब्रिजेश कुमार कश्यप, उप स्टेशन प्रबंधक पी. एस भट, रेल्वे स्थानक आरोग्य निरीक्षक प्रशांत डोंगरे, अकोला मनपा आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर, मनपा आरोग्य निरीक्षक सूरज खेंडकर, शैलेंद्र पवार, सोहम कुलकर्णी, नीलेश घावडे, शुभम पुंड, संकल्प महिला बचत गट, गुरू माऊली महिला बचत गट, मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांचा सहभाग होता.
अधिक वाचा : शेतकरी हा ‘स्मार्ट उद्योजक’ कार्यशाळेत रेशीम शेती व उदयोग विषयावर केले जाणार मार्गदर्शन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola