अकोला(प्रतिनिधी) : १३ डिसेंबर २०१८ वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत ३ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०१८ दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई केली. यामध्ये अकोला मंडलातील अकोला शहर, अकोला ग्रामीण आणि अकोट विभागात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार एकूण २४० जणांवर तर कलम १२६ नुसार एकूण १६ ग्राहकांवर अशा एकूण २५६ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास ४६ लाख रुपयांची वीज चोरी व गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे.
वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत आणि अकोला परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या निर्देशानुसार सर्व कार्यकारी अभियंते यांचेसह विविध पथकामध्ये अभियंते, अधिकारी कर्मचारी व जनमित्र सहभागी असलेल्या टीम निर्माण करून या मोहिमेत सहभाग घेतला. यामध्ये अकोला मंडळातील अकोला शहर विभागात २५, अकोला ग्रामीण विभागात १३४ आणि अकोट विभागात ८१ अशा एकूण २४० जणांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली.
यामध्ये वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून १४८ ग्राहक तर थेट आकोडे टाकून वीजचोरी करणाऱ्या ९२ जणांचा समावेश होता. विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्यामध्ये अकोला शहर विभागात ३, अकोला ग्रामीण विभागात ११, अकोट विभागात २ ग्राहकांवर एकूण १६ ग्राहकांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. अशा एकूण २४५ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास ४२ लाख रुपयांची वीज चोरी व गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. या मोहिमेमध्ये पथकांनी जिल्हातील शहरे व ग्रामीण भागामध्ये तपासणी केली, तसेच संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वीसुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये वीज चोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये अनेकांवर कारवाई करण्यात आली.
वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून जिल्ह्यातील व शहरातील जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्चित असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून देणारे तांत्रिक सूत्रधार सुद्धा महावितरणच्या रडारवर आहेत. तरी ग्राहकांनी वीजचोरी,अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
मुर्तीजापूर उपविभागातील राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबी येथे धाब्यावरील वीज पुरवठा जवळपास १ लाख रुपयाच्या विदयुत थकबाकीमुळे खंडित केलेला असताना विदुयत तारेवर आकोडा टाकून अवैधरीत्या वीज वापर सुरु असल्याचे ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता गजेंद्र गडेकर यांना व त्यांच्या टीमला मोहिमेदरम्यान काल आढळून आले. सदर ठिकाणी भारतीय विदयुत कायद्याच्या कलम १३५ नुसार कार्यवाही करण्यात आली.
अधिक वाचा : शेतकरी हा ‘स्मार्ट उद्योजक’ कार्यशाळेत रेशीम शेती व उदयोग विषयावर केले जाणार मार्गदर्शन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola