अकोला :- मा. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने रस्ते अपघातावर नियंत्रणासाठी सुचविलेल्या उपाययोजना रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट निश्चित करून सुधारात्मक उपाययोजना करण्यासाठी परिवहन आयुक्त यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक 15 डिसेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
परिवहन आयुक्त यांच्या 6 जुन 2017 च्या परिपत्रकातील निर्देशानुसार जिल्हयात ब्लॅक स्पॉटची यादी नव्याने करण्यासंदर्भात तसेच अपघात व अपघाती मुत्यूचे प्रमाण चालु वर्षात 10 टक्क्यांनी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजीत करण्यात येते. या संदर्भातील बैठक जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे दर महिन्याच्या पहिल्या व तिस-या शनिवारी घेण्यात येणार आहे.
रस्त्यावरील साधारण 500 मीटर लांबीच्या तुकडयात मागील 3 वर्षात 5 रस्ते अपघात झाले असतील. ज्यामध्ये व्यक्ती मृत किंवा जखमी झाल्या असतील अथवा जेथे मागील 3 वर्षात रस्ते अपघातात 10 व्यक्ती मृत झाले असतील अशा भागाला ब्लॅक स्पॉट मानण्यात येते. जिल्हयात उपरोक्त व्याख्येप्रमाणे ब्लॅक स्पॉट नसल्याबाबत पोलीस विभागाकडून माहिती मिळाली आहे.
जरी अकोला जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात पोलीस विभागाच्या माहितीनुसार ब्लॅक स्पॉट बद्दलची माहिती निरंक असली तरीही जिल्हा सुरक्षा समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग व इतर अंतर्गत रस्ते यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया , सार्वजनिक बांधकाम विभाग , महानगरपालिका व जिल्हा परिषद या संबंधित विभागाना राष्ट्रीय महामार्ग , राज्य मार्ग , शहरी मार्ग, या रस्तावरील खड्डे बुजविणे, अपघात प्रवण क्षेत्रावर उपाययोजना दर्शक व सुचना फलक लावणे, अपघात प्रवण स्थळावर पोलीस विभागाचे ,आरोग्य विभागाच्या ॲब्लुन्स करिता टोल फ्री हेल्पलाईन नंबर प्रदर्शीत करणे तसेच रस्ता सुरक्षा विषयक स्लोगण वाहनाच्या मागील बाजूस प्रदर्शीत करणे यासारखे वेळोवेळी निर्देश देण्यात येतात.
रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस विभागाकडून विहित मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे , लाल सिंग्नल ओलांडून जाणे , मालवाहू वाहनामधुन क्षमतेपैक्षा जास्त मालाची वाहतुक करणे, दारू पिऊन किंवा अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणे, वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर करणे या सारख्या गुन्ह्यावर कार्यवाही करून अनुज्ञप्ती निलंबन करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
अधिक वाचा : जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 चा प्रारुप आराखडयाबाबत बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola