तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथील एका व्यापाऱ्याला चोरट्यानी सिनेस्टाईल पाठलाग करून व्यापाऱ्याचे एक लाख साठ हजार रुपये लुटल्याची घटना दीड वाजेच्या दरम्यान घडली याबाबत तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
दहिगाव येथील व्यापारी सुभाष अग्रवाल हे कापसाचे व्यापारी असून आज तेल्हारा येथिल बँकेमधून एक लाख साठ हजार रुपयांचा विड्रॉल करून पैसे बॅग मध्ये ठेऊन निघाले स्थानिक भागवत मंगल कार्यालया जवळ अज्ञात चोरट्यानि त्यांचा पाठलाग करून रस्त्यावर काही पैसे टाकून तुमचे पैसे पडले असे व्यापारी अग्रवाल यांना सांगितले त्यामुळे व्यापाऱ्याने गाडी थांबवून पैसे उचलण्यासाठी थांबले मात्र पैशांची बॅग गाडीलाच ठेवली हीच संधी बघून चोरट्यानि एक लाख साठ हजाराची बॅग लंपास केली.त्या नंतर अग्रवाल यांनी पाठलाग करण्याचा पर्यन्त केला मात्र चोरटे पसार झाले होते.याप्रकरणी सुभाष अग्रवाल यांनी तेल्हारा पोलिसांना संपर्क केला असता पोलिसांनी शोध घेतला मात्र चोरटे मिळून आले नाहीत.याप्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून मात्र तेल्हारा शहरात अशा प्रकारची घटना घडल्याने शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक वाचा : तुदगाव येथील २५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola