अकोला – नववर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने अकोला जिल्हा प्रशासन वेगाने कामाला लागले आहे . यामुळे जिल्हाला नवी ओळख मिळाली असून अकोला जिल्हा राज्यात पहिल्या पाचमध्ये समाविष्ट झाला आहे.
भारत निवडणूक आयोगाचे सीइओ (महाराष्ट्र) अश्वीनीकुमार यांनी, शुक्रवारी सकाळी व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे अकोल्याचा आढावा घेतला. यावेळी ही माहिती पुढे आली. नव्या मतदारांची नोंदणी, इव्हीएम-व्हीव्हीपॅटचा प्रचार, मतदान केंद्रांची पुनर्रचना, मतदार यादीचे पुनरिक्षण, मनुष्यबळाची उपलब्धता, वाहनांचे अधिग्रहण, निवडणूक सुलभ व्हावी यासाठी विविध समित्यांचे गठन आदी मुद्द्यांचा यावेळी आढावा घेण्यात आला. तब्बल तीन तास चाललेल्या या व्हीसीला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी वैशाली देवकर, एसडीओ डॉ. नीलेश अपार, उदयसिंह राजपुत व अभयसिंह मोहिते, बाळापुरचे तहसीलदार, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सतीश काळे, अव्वल कारकून वैजनाथ कोरकने उपस्थित होते.
मतदारांची नोंदणी आणि निवडणूकविषयक समित्यांचे गठन यामध्ये अकोला जिल्ह्याने उल्लेखनीय काम केले आहे. हे काम राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या तुलनेत प्रशंसनीय असून ते पहिल्या पाच जिल्ह्यांच्या पात्रतेचे असल्याचा स्पष्ट उल्लेख यावेळी निवडणूक आयोगातर्फे केला गेला. जिल्ह्यात १,६८० मतदान केंद्रे असून या केंद्रांची योग्य ती पुनर्रचना करण्यात आली आहे. दरम्यान व्हीव्हीपॅट व इव्हीएमच्या प्रचारासाठीचा जिल्ह्याचा कार्यक्रम तयार असून येत्या एक-दोन दिवसांत या कार्यक्रमाला आयोगाची मंजुरीही प्राप्त होणार आहे. ती प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक तालुका आणि तालुक्यातील प्रत्येक गाव अशाप्रकारे तो राबविला जाईल.
निवडणूक सुधारणांचा भाग म्हणून यावर्षी न्यायाधीशांसाठी स्वतंत्र प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे. इव्हीएमची ओळख सर्वांनाच आहे. परंतु या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा सरसकट वापर होणार असल्याने त्याबाबतची माहिती सर्वदूर जावी, हा या प्रशिक्षणामागचा उद्देश आहे. निवडणूक यंत्रणा थेट न्यायालय परिसरात यंत्रे नेऊन त्याबाबतची माहिती देणार आहे.
आदिवासी नागरिकांना नव्या सुधारणांची माहिती व्हावी म्हणूनही विशेष प्रयत्न केले जाणार आहे. अकोला जिल्ह्याला प्राप्त झालेल्या इव्हीएम व व्हीव्हीपॅटपैकी किमान १० टक्के यंत्रे लोकांमध्ये पोहोचविली जाणार आहेत. त्यासाठी आदिवासी पाडे, दलीत वस्त्या आणि बाजारहाट अशा ठिकाणी िशबिरे लावली जातील. यासाठीचा जिल्हाव्यापी कार्यक्रमही आखण्यात आला असून जिल्हास्तरावरील ‘की रिसोर्स अँन्ड रिसोर्स पर्सन्स’चे प्रशिक्षण लवकरच घेतले जाणार आहे.
अधिक वाचा : युतीसाठी भारिपसोबत ४ बैठका, आंबेडकरांना अकोल्याची जागा देण्यासही तयार – पृथ्वीराज चव्हाण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola