फलंदाज बाद झाल्यानंतर आमच्या खेळाडूंनी भारतीय कर्णधार विराट कोहली सारखा जल्लोष केला असता तर, ‘जगातील सर्वात वाईट माणसं’ म्हणत त्यांच्यावर टीका झाली असती, असं सांंगून ऑस्ट्रेलिया संघाचा प्रशिक्षक जस्टिन लँगर यानं कोहलीच्या कृतीवर आक्षेप घेतला आहे. तसंच त्यानं माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या टिप्पणीवरही टीका केलीय.
ऑस्ट्रेलियानं कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सात विकेटच्या मोबदल्यात १९१ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून केवळ ट्रेव्हिस हेडनं अर्धशतकी खेळी केली होती. त्यावर सचिन तेंडुलकरनं ट्विट केलं होतं. ‘घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी घेतलेला बचावात्मक पवित्रा याआधी मी कधी अनुभवलेला नाही,’ असं त्यानं म्हटलं होतं. त्यावर लँगरनं टीका करत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना स्लेजिंगपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
सचिन जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा, तो काळ वेगळा होता. सचिन खेळत असताना ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर, डेव्हिड बून, स्टीव्ह वॉ, मार्क वॉ आणि रिकी पाँटिंग आदी खेळाडू होते. त्या खेळाडूंकडे मोठा अनुभव होता. पण आताच्या संघातील खेळाडूंना, विशेषतः फलंदाजांना तितका अनुभव नाही, असं लँगर म्हणाला.
अधिक वाचा : ICC T20I Rankings : कुलदीप यादव ‘टॉप ५’ मध्ये
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola