अकोला (प्रतिनिधी) : अकोट नगर पालिकेच्या नगरसेवक व नगरसेविकेच्या मुलासह 28 जणांना जुगार अड्ड्यावरून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला. परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
जुगारी नगरसेवकांमध्ये मुख्तार रवान अय्युब खान, सलीम नबीउल्ला खान, आरिफ मारूफ यांच्यासह नगरसेविकापुत्र मनोज चंदन यांचा समावेश आहे. याशिवाय जितेंद्र चंडालिया हा माजी नगराध्यक्षांच्या कुटुंबातील एक सदस्यासह अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील काही मोठ्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अकोट शहरातील अंजनगाव मार्गावरील माऊली मनोरंजन केंद्रात हा गोरखधंदा सुरू होता. या कारवाईत पोलिसांनी ५० हजारांच्या रोख रकमेसह सव्वा ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, डॉ. निलेश देशमुख व त्यांच्या पथकाची गेल्या १० दिवसांतील ही चौथी मोठी कारवाई आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध धंद्याना आळा बसला आहे.
अधिक वाचा : सेवा निवृत्त जवानाचा शिर्डीत गोळीबार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola