शिर्डी : लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या मध्य प्रदेशमधील एका जवानाने शिर्डीत येऊन गोळीबार केला. या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली आहे. ही घटना रात्री एकच्या सुमारास कौशल्या हॉटेलसमोर घडली. पुष्पराज रामप्रसाद सिंह (वय ३८) असे या सेवानिवृत्त जवानाचे नाव असून त्याच्याविरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. नवीन कार खरेदी केल्याच्या आनंदातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पुष्पराज सिंहने नवीन खरेदी केली असून तो आपला भाऊ आणि मित्रांसह साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत आला होता. त्यांनी पालखी रस्त्यावरील हॉटेल कौशल्या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. साईबाबांचे दर्शन घेऊन त्यांनी कारची पूजा केली. रात्रीचे जेवण घेऊन सर्वजण हॉटेलवर परतले. हॉटेल परिसरात कार उभी करुन पुष्पराज सिंहने हवेत गोळीबार करुन आनंद साजरा केला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेतली. पोलिसांच्या चौकशीत पुष्पराजने नवीन कार खरेदी केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी गोळीबार केल्याचे सांगितले.
अधिक वाचा : रस्त्याचे काम सासऱ्यांना देणे महागात पडले, सरपंचाने पद गमावले! जिल्हाधिकाऱ्यांचा ऐतिहासिक निर्णय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola