अकोला (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने अकोला महानगर पालिका वैद्यकीय विभाग, निमा व निमा विमेन्स फोरम, अकोला, यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ima. fogsi. यांच्या सहकार्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या सर्व आस्थापनेवरील तसेच कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिरामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची तज्ञ डॉक्टरांकडून ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, लघवी, संडास, डोळे, दात, कान, नाक, घास, त्वचा इत्यादी आजार तसेच दमा, मधुमेह, कावीळ, HIV व क्षयरोग संबंधी तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्ती संदर्भात देखिल मार्गदर्शन करण्यात आले.
महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशालीताई शेळके यांनी शिबिराला भेट दिली. शिबिरामध्ये महापौर विजय अग्रवाल यांनी देखिल आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या वेळी महापौर विजय अग्रवाल यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला.
आरोग्य तपासणी शिबिरामध्ये डॉ. दिनेश राठी, डॉ. संजय तोष्णीवाल, डॉ. रवी अलिमचंदानी, डॉ. अनिल तोष्णीवाल, डॉ. ज्योती कोकाटे, डॉ. मनोहर घुगे, डॉ. सुनील लुल्ला, डॉ. मंजुषा तोष्णीवाल, डॉ. स्वाती सांगळे, डॉ. मेघा महापांडे, डॉ. मधू अग्रवाल, डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. सीमा तायडे, डॉ. आशा निकिते, डॉ. जयपुरे वाजीद अली, डॉ. अरविंद गुप्ता, डॉ. चैतन्य वाकडे, डॉ. अविनाश गणवीर, डॉ. आदिल खान, डॉ. रेहान खान, डॉ. अस्मिता नागर, डॉ. माया नारंगल, डॉ. तृप्ती राकटे, डॉ. वृषाली पाटील, डॉ. प्रीती मुरकुटे, अंकुश धूड, अजय गावंडे, प्रवीण रोठे, जया गावंडे यांनी आरोग्य सेवा दिली.
या आरोग्य शिबिरामध्ये मनपा उपयुक्त सुमंत मोरे, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, पूनम कळंबे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ फारुख शेख, मनपा आरोग्य विभागाचे प्रशांत राजूरकर, अब्दुल मातींन, मुख्य आरोग्य निरीक्षक संजय खोशे, सर्व आरोग्य निरीक्षक तसेच मनपा आरोग्य विभागातील सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
व्हिडिओ : अकोल्यासह जिल्ह्याभरात महापरिनिर्वाण दिनानिमित्य महामानवाला अभिवादन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola