अकोला (प्रतिनिधी): वेगळा विदर्भाची मागणी घेऊन तृतीय पंथीयांनी शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारेबाजी करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. ही मागणी जन सत्याग्रह संघटनातर्फे देण्यात आली.
वेगळ्या विदर्भाची मागणी ही भारत स्वतंत्र झाल्याच्या आधीची आहे. परंतु, या मागणीकडे राजकीय नेत्यांनी लक्षच दिले नाही. विदर्भाच्या आधी तेलंगणा राज्य झाले. खरे पाहता ही मागणी आताची आहे. असे असताना केंद्रातील सरकार विदर्भ राज्याच्या मागणीसाठी अनुकूल दिसत नाही. भाजप पक्षाने आम्ही सत्तेत आल्यावर वेगळा विदर्भ करू, असे आश्वासन दिले होते. परंतु, त्यांनी त्यांच्या आश्वासनाकडे दूर्लक्ष केले आहे.
विदर्भातून राज्याला वीज पुरवठा होतो. तसेच विदर्भ हे सक्षम असतानाही सरकार विदर्भ राज्य करण्यास का विलंब करीत आहे, असा प्रश्न संघटनेमार्फत उपस्थित केला जात आहे. जन सत्याग्रह संघटनेच्या नेतृत्वात तृतीयपंथीयांनी ही मागणी करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. हे निवेदन संघटनेच्या महानगर अध्यक्ष सिमरन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
अधिक वाचा : गाेवर-रुबेला लसीमुळे 30 बालकांना ‘रिअॅक्शन’
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola