अकाेला (प्रतिनिधी): गोवर, रुबेला लस दिल्यामुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत 30 शालेय बालकांना रिअॅक्शन झाल्याची बाब समाेर आली आहे. त्यापैकी दाेन मुलींची तब्येत अत्यवस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.
विषाणूजन्य गाेवर व संसर्गजन्य रूबेला राेगाच्या उच्चाटनासाठी जिल्ह्यात गोवर व रूबेला एकत्रित लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. माेहिमेचा राज्यभर 27 नाेव्हेंबरपासून शुभारंभ करण्यात आला. त्याअंतर्गत जिल्ह्यातील शहरीसह ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाड्यातील बालकांना आराेग्य विभागाच्या वतीने गाेवर, रूबेलाची लस देण्यात येत आहे. लसीकरणानंतर बालक गोवर आणि रूबेला या दोन आजारापासून सुरक्षित हाेत असल्याचा दावा आराेग्य विभागाच्या वतीने करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मात्र लस घेतल्यामुळे बालकांना रिअॅक्शन हाेण्याच्या घटना समाेर येत आहेत.
अभियान सुरू झाल्याच्या तारखेपासूनच जिल्ह्यात लसीमुळे रिअॅक्शन झालेल्या बालकांची संख्या 30 वर पाेहचली आहे. त्यापैकी संस्कृती अरूण साेनाेने (रा. अकाेट, वय १५ वर्षे) या मुलीची तब्बेत खालावल्याने तिला सर्वाेपचार रुग्णालयात तर श्रेया मुलसिंग राठाेड (रा. आलेगाव, वय ५ वर्षे) या मुलीला खाजगी रुग्णालयात भरती करावे लागले. उपचारानंतर दाेन्ही मुलींच्या प्रकृतीत सुधारणा हाेत असल्याची माहिती आहे. लसीकरणानंतर रिअॅक्शन हाेणाऱ्या बालकांची संख्या वाढत असल्यामुळे लस दिल्यानंतर एक लाखात एखाद्या बालकालाच रिअॅक्शन हाेऊ शकते, असा आराेग्य विभागाचा दावा फाेल ठरत असल्याचे दिसून येत आहे.
रिअॅक्शनचे प्रमाण मुलींमध्ये सर्वाधिक
जिल्ह्यात आतापर्यंत रिअॅक्शन झालेल्या 30 बालकांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. तर रुग्णालयात सुद्धा दाेन मुलींनाच भरती करण्यात आले आहे. लस घेतल्यानंतर अंगाला खाज येणे, उलटी होणे, अंगावल लहान फाेड येण्यासारखे प्रकार हाेत आहेत.
88 हजार बालकांना दिली लस
आराेग्य विभागाच्या वतीने आतापर्यंत ८८ हजार ३३९ बालकांना गाेवर, रुबेलाची लस देण्यात आली आहे. माेहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २७ नाेव्हेंबर राेजी २६ हजार ६०१, २८ नाेव्हेंबरला २१ हजार ८८९, २९ ला २० हजार ३८० तर ३० नाेव्हेंबरला १९ हजार ४६९ बालकांचे लसीकरण करण्यात आले.
अधिक वाचा : शेतकरी दाम्पत्याने शेतात विष प्राशन करून केली आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola