अकोला (प्रतिनिधी): अमरावती विभागातील तसेच हिंगोली जिल्हयातून जाणारे विविध राष्ट्रीय महामार्गांची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. अकोला शहरातील अशोक वाटिका येथील उडडाणपुलाचे कार्य आदेश झाले आहेत. न्यू तापडिया येथील उडडाणपुलाचे टेंडर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे स्पष्ट करुन मुर्तिजापूर-अकोला-खामगाव रस्त्यांची डागडुजी तातडीने करावी.
अकोला-मेंडशी या चारपदरी रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्यात यावी. अकोट-अकोला रस्त्याच्या कामाची गती वाढवावी. अकोला मनपा हददीतील शिवर-पीकेव्ही-नेहरुपार्क चौक ते वाशिम बायपास यांचे एलओए एक महिन्यात मंजूर होईल. नव्याने राष्ट्रीय महामार्ग म्हणून तयार होणारा पातूर-बाळापूर-जळगाव जामोद या रस्त्याबाबत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करुन प्रस्ताव पाठविण्यात यावा. तसेच खामगाव शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कामाची गती वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेवरुन अकोला, बुलडाणा, वाशिम व हिंगोली या जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील समाविष्ट राष्ट्रीय मार्गांच्या कामांचा व प्रगतीचा आढावा लोकशाही सभागृहात आज घेण्यात आला. यावेळी उपस्थित श्री. गडकरी यांचे विशेष कार्य अधिकारी सुधीर देऊळगावकर यांनी रस्त्यांच्या कामाच्या अडचणी जाणून घेऊन मार्गदर्शन केले. या बैठकीस वाशिमच्या खासदार भावनाताई गवळी, आमदार सर्वश्री प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, हरिष पिंपळे, राजेंद्र पाटणी, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी निरुपमा डांगे, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा, हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आदींसह राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्रथम वाशिम जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये अकोला-मेडशी, मेडशी-वाशिम आणि वाशिम-पांगरे या राष्ट्रीय मार्गाच्या कामातील अडचणी जाणून घेण्यात आल्या. या रस्त्याशी संबंधित भूसंपादन व इतर शिफटींगची (विदुत पोल, जलवाहिन्या) कामे जलदगतीने पूर्ण करावीत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन वेळेत सर्व कामे मार्गी लावावीत, अशी सूचना श्री. देऊळगावकर यांनी केली. हिंगोली जिल्हयातील वाशिम-पांगरे, पांगरे-वारंगाफाटा, अकोला जिल्हयातील अकोला-मेडशी या राष्ट्रीय मार्गासाठी भूसंपादन व इतर शिफटींगची कामेही त्वरेने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. प्रलंबित मार्गासाठी वनविभागाच्या आवश्यक त्या परवानग्या घेण्याचेही त्यांनी सांगितले.
अकोला-अकोट रस्त्याचे काम जलदगतीने होण्यासाठी कंत्राटदाराकडे सातत्याने पाठपुरावा करुन दैनंदिन कामाचा अहवाल पाठविण्याचे त्यांनी सूचित केले. अकोला-अमरावती रस्त्यावरील खडडयांच्या डागडुजीचे कार्य आदेश जारी करण्यात आले असून सोमवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे त्यांनी सांगितले. बैठकीत अमरावती-चिखली बंद असलेल्या कामावर सकारात्मक चर्चा झाली. तात्पुर्ती दुरुस्ती सोमवारपासुन केली जाणार आहे.
रस्त्यांच्या कामांसोबत जलसंधारणाच्या कामांची सांगड घालुन अकोला व बुलडाणा जिल्हयात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या उत्कृष्ट कामांबदल दोन्ही जिल्हयांच्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयाने विशेष दखल घेऊन त्यांचे कौतुक केल्याचे यावेळी श्री. देऊळगावकर यांनी सांगितले.
अधिक वाचा : सामाजीक दायित्व व संकल्पपूर्ती निरंजनजी बोंबटकर यांनी सामाजीक दायित्वाचा दिला परिचय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola