अकोला (प्रतिनिधी) : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना येथून जवळच असलेल्या गांधीग्राम येथे शनिवार, १ डिसेंबर रोजी सकाळी घडली. शेख उमर शेख मन्नान (४७) आणि नजरुन बी शेख उमर (४३) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
गांधीग्राम येथील शेख उमर याच्याकडे दोन ते अडीच एकर शेत असून, यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गत काही वर्षांपासून नापिकीचा सामना करावा लागत असलेल्या शेख उमर याच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५० ते ६० हजार रुपयांचे कर्ज आहे. चार मुलांच्या कुटुंबाचा गाडा ओढताना उमरची मोठी ओढतान होत होती.
शुक्रवारी सकाळी शेख उमर व त्याची पत्नी नजरुन बी दोघेही शेतात कापूस वेचणीसाठी गेले. त्या ठिकाणी दोघांनीही किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. घटनेची वार्ता पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. माहिती समजताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मनमिळाऊ स्वभावाचा शेख उमर आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.
अधिक वाचा : पातुर पं स अंतर्गत घरकुल महाघोटाळा उघड,कारवाईची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola