अकोला (शब्बीर खान) : कापशीहून बार्शीटाकळीकडे मालवाहू वाहनात जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार गोवंशाना गुरुवारी जीवदान दिले आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कापशीहून बार्शीटाकळीकडे जाणाऱ्या एम.एच.२८, ८६४९ क्रमांकाच्या वाहनातून चार बैल निर्दयतेपणे कोंबून नेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सिंदखेड फाटा टी पॉंईटवर सापळा रचून पोलिसांनी वाहनाला अडविले.
यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चार बैल बांधलेले आढळून आले. यावेळी आरोपी अब्दूल लतीफ अब्दूल रशीद (३२), आणि इम्रान उल्ला खॉं रफू खॉ (३५) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६० हजार किंमतीचे ४ बैल, ३ लाख किंमतीचे वाहन असा एकूण ३ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनकर बुंदे,दत्तात्रय ढोरे, संदीप तिवारी, फिरोज खान, आश्विन शिरसाट, अनिल राठोड, आशीष ठाकूर यांनी केली.
अधिक वाचा : पातुरच्या घरकूल योजनेची चौकशी करा – न्यायालय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola