पातुर(सुनील गाडगे)- पातुर पंचायत समिती कडून घरकुल योजना राबवन्यात आली.सदर घरकुल योजनेत महाघोटाळा झाल्याचे उघड झाले आहे.याप्रकरणी संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी होत आहे.तशी तक्रार गटविकास अधिकारी यांच्या कडे करणयात आली आहे.
पातुर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तुलंगा खुर्द येथे ग्राम पंचायत च्या सचिवाने कागदी घोडे नाचवून घरकुल बांधकाम पूर्ण झाल्याचे दाखवून प्रत्यक्ष लाभार्त्याना घरकुल योजनेपासून वंचित ठेऊन घरकुलचे बांधकाम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले.यामध्ये घरकुलाचे पैसे ६५ हजार ५०० रुपये परस्पर काढून गैरव्यवार करण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले असून संबंधित सचिवावर अपहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी रितेश सोनोने व रामकृष्ण मेटकर यांनी गट विकास अधिकारी यांच्या कडे केली असून याप्रकरणी कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : पातुरच्या घरकूल योजनेची चौकशी करा – न्यायालय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola