मुंबई : महाराष्ट्रातील महिला आणि युवतींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने अभिनव प्रयोग राज्यात राबविण्याचा विचार सुरू केला आहे. महिला आणि तरुणींच्या संरक्षणासाठी त्यांना गळ्यात घालण्यासाठी सुरक्षेची पॅनिक बटन चेन उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. संकटकाळात मदतीसाठी पॅनिक बटन दाबल्यानंतर पोलिसांनी अडचणीत असलेल्या महिलांचे लोकेशन कळून मदत करणे शक्य होणार आहे. एक हजार रुपये किंमतीच्या अशा चेनवर सबसिडी देण्याचा सरकारचा विचार असल्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
राज्यात महिला व युवतींवरील अत्याचार रोखण्यासाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी गृह विभागातर्फे महिलांच्या संरक्षणासाठी, त्यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी गृह विभागातर्फे केल्या जाणाऱ्या विविध उपाय योजनांची केसरकर यांनी बुधवारी सभागृहात माहिती दिली. त्यावेळी त्यांनी पॅनिक बटन चेनचा अभिनव प्रयोग राज्यात राबविण्याचा सरकारचा मानस असल्याचे स्पष्ट केले.
आश्रम शाळांत महिला अधीक्षक
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेतल्या आठ अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेबाबत शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. सांगलीतील त्या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांना या प्रकरणात सहआरोपी केले जाईल असे आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुलींच्या आश्रमशाळांमध्ये सुरक्षा समित्या नेमण्याची मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी आश्रमशाळांमधील मुलींच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. यापुढे राज्यातील मुलींच्या आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये महिला अधीक्षक नेमण्यात येतील अशी माहिती भटके विमुक्त व ओबीसी विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. मिनाई आश्रमशाळेत झालेल्या मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून या आश्रमशाळेवर प्रशासक नेमण्यात आला आहे अशी माहिती शिंदे यांनी दिली.
अधिक वाचा : मराठा आरक्षण : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण, विधानसभेत कृती अहवाल सादर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola