अकोला (शब्बीर खान) : अवैधपणे रेती वाहतूक करणारे टाटा ४०७ वाहन उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांच्या विशेष पथकाने जप्त केले. यामुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. उप विभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पााटील यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख तुषार नेवारे यांच्या नेतृत्वात रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाNया मासूम शाह दर्गा मरघट रोड जवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी तुषार नेवारे, विनय जाधव, राज चंदेल उपस्थित होते. दरम्यान, रेती माल रॉयल्टीच्या शहानिशेसाठी महसुल विभागाला पथकाद्वारे देण्यात आलेल्या पत्राच्या आधारे महसूल विभागाने रेती मालकाला १,१६,०००/-रुपयांचा दंडही ठोठावला.
अधिक वाचा : अकोल्यात शिक्षणासाठी येत असलेल्या शाळकरी मुलांच्या अॅपेला अपघात; विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola