मुंबई : आता मोबाईलवर फ्री इनकमिंग कॉल्स बंद होण्याची शक्यता आहे. फ्री इनकमिंग कॉल्ससाठी मोबाईलवर सर्वांनाच मिनिमम रिचार्ज करावा लागणार आहे. मिनिमम रिचार्जसाठी कंपन्यांनी तसे नवे प्लॅन सुरु केले आहेत. ग्राहकांना दर महिन्याला खास इनकमिंगसाठीचे प्लॅन्स देण्यात येणार आहेत. त्यानुसार रिचार्ज करावे लागतील. त्यामुळे आता केवळ इकमिंगसाठी सिमकार्ड वापरता येणार नाही.
काही ग्राहक केवळ इनकमिंगसाठीच सिम कार्ड्स वापरतात. हल्ली प्रत्येक मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड्सची सुविधा उपलब्ध असल्याने अनेक ग्राहक केवळ एकाच सिम कार्डवर रिचार्ज करतात. त्यामुळे ग्राहक एका सिमकार्डवर केवळ इनकमिंग कॉल्स घेत असतील तर यापुढे अशी फ्री इनकमिग सेवा मिळणार नाही. फ्री इनकमिंग सेवेसाठी प्रत्येक ग्राहकाला रिचार्ज करावाच लागेल. रिचार्ज केला नाही तर इनकमिंग कॉल्सची मोफत सेवा बंद होईल.रिलायन्स जिओच्या स्वस्त रिजार्च पॅकमुळे इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि वोडाफोन या दोन मोठ्या कंपन्या एकत्र आल्या. आता या कंपन्यांनी तोट्यातून बाहेर पडण्यासाठी हा नवा फंडा शोधला आहे.जिओ कंपनी सुरु झाल्यापासून अनेक युजर्स इतर कंपन्यांच्या सिम कार्ड्सचा उपयोग केवळ इनकमिंग कॉल्ससाठी करतात. यादरम्यान रिचार्ज न केल्याने कंपन्यांना त्यांच्या ARPU म्हणजेच अॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर (प्रति ग्राहक सरासरी महसूल) मध्ये खूप नुकसान होत आहे. या नुकसानभरपाईसाठी आता मिनिमम रिचार्ज करावे लागणार आहे.
अधिक वाचा : व्हॉट्सअॅपच्या ग्रुप चॅटमध्ये मिळणार ‘Private Reply’ फीचर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola