अकोला (शब्बीर खान) : शिक्षण हे पवित्र क्षेत्र असून, शिक्षकेतर हा त्यातील कणा आहे.परंतु त्यांना अनेक अडीअडचणीलाा सामोर जावे लागत आहे. तो अनेक अडचणीच्या गराड्यात सापडला आहे.त्यांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी संघटनेला सदैव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोरे यांनी महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटनेच्या जि.प.कर्मचारी भवन येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात केले. आकृतीबंध व वाढता ताणतणावामुळे शिक्षकेतर कर्मचाNयांमध्ये असंतोष खदखदत आहे. शिक्षकेतरांच्या अन्याय मागण्यांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्या सोडवाव्यात,अन्यथा शाळांमध्ये अव्यवस्था निर्माण होऊ शकते, असे मत शिक्षण तज्ज्ञ डॉ.दिलीप देशमुख यांनी उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले. शासन शिक्षणाप्रती उदासीन असून शिक्षण विभागातील अधिकायांचे व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाNयांच्या पदे भरतीस बंदी घालून शिक्षण क्षेत्रावर अन्याय करीत आहे.कर्मचाNयांच्या लढाईला माझा पाठींबा राहील असे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संध्याताई हरीभाऊ वाघोडे यांनी अध्यक्षीय भाषण करतांना सांगितले. शिक्षकेतरांशिवाय शाळांचे कामकाज पूर्ण होऊ शकत नाही परिणामी त्यांचा शिक्षण विभागातर्पे गुणगौरव करण्याविषयी दखल घेतल्या जाईल, असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुवूंद यांनी प्रतिपादित केले.
यावेळी राज्यमंत्री जयकुमार रावळ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे भाषण दिले.शिक्षण सहाय्यक उपसंचालक तेजराव काळे यांनी मनोगत व्यक्त केले.राज्यभरातून दोन हजार शिक्षकेतरांनी उपस्थिती लावून हे अधिवेशन ऐतिहासिक केल्याचे राज्य अध्यक्ष सतिष नाडगौडा यांनी सांगितले. त्यांनी यावेळी पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांचा संदेश वाचून दाखविला. प्रास्ताविक राज्य कार्याध्यक्ष विलास अत्रे, अहवाल वाचन महासचिव मिलींद जोशी, संचालन पुजा काळे यांनी केले.जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्यवाह विजय ताले यांनी आभार मानले.
अधिक वाचा : शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी व्यवस्थापकीय समितीवर विशाल बोरे यांची नियुक्ती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola