अकोट (शब्बीर खान): मुस्लीम धर्माचे प्रेषीत हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती २१ नोव्हेंबर रोजी स्थनिक अकोट फैल मस्तान चौक येथे हिन्दू व मुस्लिम बांधवांनी मोठ्या हर्षोल्हासात साजरी केली. मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने विविध ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उत्साहात साजरा करण्यात आला.
अकोट फैल नायगांव मुस्लिम कब्रस्तान मस्जिद ट्रस्ट च्या वतीने कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ अशोक ओळम्बे पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक हरीश अलिमचंदनी, दीपक माई, गजानन गोलाईत उपस्थित होते. सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथीच्या हस्ते मिरनुकतिल मुस्लिम समाज बांधवांना आइस्क्रीम चे वितरण करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन अकोट फैल नयागांव मुस्लिम कब्रस्तान व मस्जिद ट्रस्ट अध्यक्ष सै रहीम उर्फ सैदूभाई सचिव नौशाद खान समद खान यांनी केले.
कार्यक्रमामध्ये शेख हकीम रेडीमेड वाले, प्रभाकर वानखड़े, हुसेन खान लीडर, सै कलीम, टोनी जयराज, मेहताब शाह, सोनो बुंदेले, मो फारुख पटेल, शे सलमान, आकाश पितले, सोनो माधवे,दीपक जिराजे, इमरान खान, कलीम राकेश रंजितकरा सै सलीम, समीर खान, लाला पर्वते, मोहम्म्द अनवर किराणा वाले, शेख अहमद, शेख कलीम ऑटोवाले, परवेज अहमद ऑटोवाले, जमील ठेकेदार, जम्मु पानवाले, मोहम्मद फय्याज, सै.सलीम सै.रहीम, सै.अलीम सै.अजीम उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार समीर खान नौशाद खान यांनी व्यक्त केले.
अधिक वाचा : 27 नोव्हेंबर पासून अकोला जिल्ह्यात गोवर व रूबेला एकत्रित लसीकरण मोहीम आयोजित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola